कोल्हापूर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ परिवारातर्फे आज, सोमवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत शाहूपुरी तिसरी गल्ली येथील राधाकृष्ण मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अर्पण ब्लड बँकेच्या सहकार्याने हा उपक्रम होत आहे.‘करूया रक्तदान, देऊया जीवनदान’ या उक्तीमध्ये जीवनाचे सार दडलेले आहे. रक्तदानाची एक कृती अनेकांना नवसंजीवनी देणारी असते. जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या संस्कृतीने आपले जीवन जगत असते. रक्त ही एकमेव गोष्ट आहे, जी अनोळखी माणसांशीदेखील आपले नाते जोडते. आपल्यामुळे कोणाचा तरी जीव वाचतो, ही भावनाच समाधान देणारी असते. ‘लोकमत’च्या वतीने दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते.यामध्ये मोठ्या संख्येने रक्तदाते सहभागी होऊन रक्तदान करत आले आहेत. यंदाही हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी ‘लोकमत’चे वाचक, सभासद व कोल्हापूरकरांनी रक्तदान करून मोठ्या संख्येने या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा.वेळ : स.९ ते सायं. ५स्थळ : शाहूपुरी तिसरी गल्ली, राधाकृष्ण मंदिर येथे
कोल्हापुरात ‘लोकमत’तर्फे आज रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:38 IST